‘चेकमेट’ : महाराष्ट्रात पहाटे पहाटे झालेल्या शपथविधी नाट्याची रोमहर्षक कहाणी
एका ऐतिहासिक राजकीय नाट्याची मीमांसा या पुस्तकात चपखलपणे केली आहे. उभा महाराष्ट्र झोपेत असताना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर पहाटे पहाटे आश्चर्यकारकरित्या शपथविधी घडला आणि सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील मातब्बर, तसेच सामान्य माणूस अवाक् झाला. त्या संपूर्ण नाट्याचे पत्रकाराच्या नजरेतून केलेले रोमहर्षक व उत्कंठावर्धक विश्लेषण म्हणजे हे पुस्तक.......